टीएमसी आमदार माणिक भट्टाचार्य यांना ईडीकडून अटक

कोलकता, ११ ऑक्टोबर २०२२: पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने मंगळवारी मोठी कारवाई केली. याप्रकरणी ईडीने तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) आमदार माणिक भट्टाचार्य यांना अटक केली. अटक करण्यात आलेला आमदार बंगाल एज्युकेशन बोर्डाचा माजी अध्यक्षही आहे.

तपासात सहकार्य न केल्याने अटक करण्यात अली

मिळालेल्या माहितीनुसार, माणिक यांची दीर्घ चौकशी केल्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीच्या पथकाने सोमवारी दुपारी माणिक भट्टाचार्य यांची चौकशी सुरू केली. प्रदीर्घ चौकशीदरम्यान तपासात सहकार्य न केल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सीबीआयने २७ सप्टेंबर रोजी टीएमसी आमदाराला चौकशीसाठी बोलावले होते, परंतु ते तपास यंत्रणेसमोर हजर झाले नाहीत. दरम्यान, आज माणिक यांना ईडीच्या वतीने पीएमएलए कोर्टात हजर केले जाणार आहे.

या प्रकरणी ईडीने अटक केलेले माणिक भट्टाचार्य हे टीएमसीचे दुसरे आमदार आहेत. यापूर्वी पार्थ चॅटर्जी यांना जुलैमध्ये अटक करण्यात आली होती. ते तृणमूल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते, पण त्यांना घेरल्यानंतर ममता बॅनर्जींनी त्यांना पक्ष आणि मंत्रिपदावरून बाहेरचा रस्ता दाखवला. पार्थ चॅटर्जींची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जीच्या दोन फ्लॅटमधून ईडीने ५० कोटींहून अधिक रुपये जप्त केले होते

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा