“तो” भीक मागणारा व्यक्ती निघाला इंजिनिअर

भुवनेश्वर(वृत्तसंस्था) : आज देशभरात कोणत्याही राज्यात गेले तरी भिकारी हा पहायला मिळतोच. त्याच महत्वाचं कारण म्हणजे वाढत्या स्पर्धेमुळे बेरोजगारीही वाढत आहे. याचाच प्रत्यय भुवनेश्वर इथल्या जयदेव विहार परिसरात आला. येथे बेरोजगारीमुळे उच्चशिक्षित व्यक्ती भिकेला लागला आहे.

उच्चशिक्षण घेतल्यानंतरही हवी तशी नोकरी न मिळाल्याने हा व्यक्ती भीक मागत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत एका फेसबुक युझरने या उच्चशिक्षित भिकाऱ्याचा फोटो पोस्ट केला आहे. तरुणाला भीक मागायची वेळ का आली? याचाही खुलासा यात करण्यात आला असून हे नक्की प्रकरण काय आहे हे पाहू.

ओडिसा राज्यातील भुवनेश्वर या शहरात रस्त्याच्याकडेला बसलेल्या व्यक्तीला एका रिक्षा चालकाने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये हा व्यक्ती जखमी झाला. रिक्षा चालकासोबत झालेल्या वादानंतर त्याने पोलीस स्थानक गाठले. त्याचे नाव गिरीजा शंकर मिश्रा (५१) असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी घडलेला सर्व प्रकार पोलिसांच्या कानावर घातला आणि रिक्षा चालकाविरोधात तक्रार दाखल केली. आश्चर्याची बाब म्हणजे मिश्राने सगळी घटना पोलिसांना अस्खलित इंग्रजीमध्ये सांगितली. त्याची अवस्था पाहून पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती बी-टेक झालेला असून त्याने प्लास्टिक इंजिनियरिंग कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले. पोटापाण्यासाठी काही काळ गेस्ट लेक्चर म्हणून काम केले. त्यानंतर मिल्टन कंपनीमध्येही त्याने नोकरी केली. मात्र नोकरी गेल्यानंतर त्याने रस्त्यावर भीक मागण्याचा निर्णय घेतला आहे. वारंवार वाढत असलेली बेरोजगारी आणि अपुऱ्या नोकऱ्यांमुळे या तरुणाचे हे हाल झाल्याचे बोलले जात आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा