अतिवृष्टी च्या अडचणीत अभाविप लोकांच्या मदतीला……

पुणे, 10 ऑक्टोंबर 2021:सलग ६ तासापासुन पुण्यातील येरवडा या भागात अतिवृष्टी झाल्या मुळे,अनेक भागातील सेवा वस्ती परीसरात घरा मध्ये पाणी साठले होते. अशा अडचणीच्या परिस्थितीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या कार्यकर्त्यांनी भर पावसात लोकांच्या मदतीला सुरूवात केली.

घरामध्ये पाणी साठल्यामुळे लोकांची गैरसोय झाली.हि परिस्थिती पाहता, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, येरवडा भागाने आधी तर अतिवृष्टी हेल्पलाईन नंबर जारी केली. नंतर परिस्थिती अजूनच बिघडल्यामुळे त्यांनी मैदानावर उतरून लोकांची मदत करायचे ठरवले. सलग ६ तास चालू असलेल्या पावसा मध्ये अभाविप च्या कार्यकर्त्यांनी अडचणीत सापडलेल्या नागरिकांसाठी सेवा कार्य सुरू केले.

येरवडा,धानोरी या परिसरात सर्वात जास्त पाणी साठल्या मुळे आणि वीजपुरवठा बंद झाल्या मुळे कार्यकर्त्यांनी मेणबत्ती तसेच कोरडा खाऊ लोकांपर्यंत पोचवण्याची सुरूवात केली. अनेक नागरिकांच्या गाड्या खाली पडल्या त्या काढण्यात आल्या. यासोबतच,साठलेल्या पाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून चेंबर्स उघडे करून ठेवले. नुकसान झाल्याने नागरिक खचून गेले होते त्यांच्या सोबत चर्चा करून त्यांना दिलासा देण्यात आला. यावेळी, शुभम बावचकर, स्नेहल जाधव, प्रज्वल राजगुरू, कुणाल दंडवते, पंकज जाधव , रौफ शेख , अनिकेत कांबळे , रोहित जाधव , नवनाथ दिसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी; प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा