नवी दिल्ली, दि. ३० जून २०२०: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संध्याकाळी चार वाजता देशाला संबोधित केले. १७ मिनिटांच्या या भाषणात मोदींनी गरीब कुटुंबांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. ते म्हणाले की गरीब कल्याण अन्न योजना दिवाळी आणि छट पुजा म्हणजे नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू राहिल. अनलॉक दरम्यान लोकांना जास्त काळजी घेण्याचे आवाहनही मोदींनी आपल्या भाषणात केले. यावेळी ते म्हणाले की सध्या वातावरण बदलत आहे. त्यामुळे सर्दी खोकला यांसारखे आजार वाढणार आहेत अशा सतर्क राहण्याच्या वेळेमध्ये आपण बेफिकीरपणे वागत आहोत. त्यामुळे सध्या आपण जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.
गरीब कल्याण अन्न योजना राहणार सुरू
• प्रत्येक गरीब कुटुंबातील प्रत्येक सदस्यास ५ महिन्यासाठी ५ किलो गहू किंवा तांदूळ विनामूल्य.
• पाच महिन्यांसाठी प्रत्येक गरीब कुटुंबाला एक किलो हरभरा दिला जाणारा.
• ८० कोटी गरीब कुटुंबांना या योजनेचा पुढील पाच महिन्यांपर्यंत फायदा होत राहणार.
• ही योजना सुरू ठेवण्यासाठी ९० हजार कोटींपेक्षा जास्त खर्च होणार आहे.
• लॉकडाऊनच्या वेळी ही योजना सुरू करण्यात आली होती, ३ महिन्यांत ६० हजार कोटी रुपये खर्च झाले.
मोदींच्या भाषणातील महत्त्वाच्या गोष्टी
१. अनलॉकमध्ये दुर्लक्ष वाढले, सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे
जगाच्या तुलनेत कोरोनाच्या बाबतीत भारत स्थिर स्थितीत आहे, परंतु अनलॉक नंतर दुर्लक्ष वाढले आहे. लॉकडाउन प्रमाणेच लोकांनी दक्षता दर्शविली पाहिजे. जे नियम पाळत नाहीत त्यांना थांबविणे आणि समजावणे आवश्यक आहे.
२. कंटेनमेंट झोनकडे बरेच लक्ष देणे आवश्यक आहे
लॉक डाऊन दरम्यान नियमांचे गंभीरपणे पालन करण्यात आले. आता सरकारांनी त्याच दक्षता पुन्हा स्थानिक संस्था, देशातील नागरिकांना दाखवण्याची गरज आहे. कंटेनमेंट झोनकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. जे नियम पाळत नाहीत त्यांना थांबवणे आणि समजून सांगणे गरजेचे आहे.
३. पंतप्रधान किंवा मंत्री कोणत्याही नियमांपेक्षा वरचे नाहीत
सध्या तुम्ही एका बातमीत पाहिले असेल की एका देशाच्या पंतप्रधानांना तेरा हजार रूपयांचा दंड भरावा लागला कारण त्यांनी मास्क वापरला नव्हता. भारतातही स्थानिक प्रशासनाने या चपळाईने काम केले पाहिजे. १३० भारतीयांना संरक्षण देण्याची ही मोहीम आहे. गाव प्रमुख किंवा देशाचे पंतप्रधान, कोणीही नियमांपेक्षा वरचढ नाही.
४. तीन महिन्यांत २० कोटी जनधन खात्यात ३१ हजार कोटी जमा
लॉकडाऊनमध्ये गरिबांच्या घरामध्ये चुली पेटल्या च नाही अशी परिस्थिती येऊ नये म्हणून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. लॉकडाऊन होताच सरकारने गरीब कल्याण योजना आणली. त्याअंतर्गत १.७५ दशलक्ष रुपयांचे पॅकेज देण्यात आले. ३ महिन्यांत २० कोटी जन धन खात्यात ३१ हजार कोटी जमा झाले आहेत. ९ कोटीहून अधिक शेतकर्यांच्या बँक खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत.
५. पुढील ५ महिन्यांसाठी मोफत धान्य योजना राबविण्यात येईल
मी यासंदर्भात महत्वाच्या घोषणा करीत आहे. प्रामुख्याने कृषी क्षेत्रात पावसाळ्याच्या काळात आणि नंतर बरेच काम केले जाते. इतर क्षेत्रात थोडीशी मंदी आहे. हळूहळू जुलैपासून सण देखील सुरू होत आहेत. ५ जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे, त्यानंतर श्रावण सुरू होईल, त्यानंतर १५ ऑगस्ट, रक्षाबंधन, गणेश चतुर्थी, नवरात्र, दुर्गापूजा. सणांच्या वेळी आवश्यकतेत वाढ होते आणि खर्चही वाढतो.
आम्ही ठरविले आहे की प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आता दिवाळी आणि छट पूजा म्हणजे नोव्हेंबर अखेरपर्यंत वाढविण्यात येईल. या निर्णयाचा अर्थ असा आहे की ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची योजना पुढील ५ महिन्यांपर्यंत सुरू राहील. सरकार दरमहा कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ५ किलो गहू किंवा ५ किलो तांदूळ मोफत देईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी