टाटा समूहाचा व्यवसायाच्या धोरणाला नवे रूप देण्यासाठी मोठा निर्णय; नवीन व्यवसायाला लागणार विशेष मान्यता

मुंबई, २३ जानेवारी २०२३ : टाटा ग्रुप एफएमसीजी ते एव्हिएशन, ऑटोमोबाईल ते इन्फ्रास्ट्रक्चरपर्यंत जवळपास सर्वच क्षेत्रांत काम करतो. अशा परिस्थितीत समूहाने आपल्या व्यवसायाच्या धोरणाला नवे रूप देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आता ग्रुपच्या कोणत्याही कंपनीला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याला विशेष मान्यता घ्यावी लागणार आहे. टाटा सन्स ही टाटा समूहाची होल्डिंग कंपनी आहे. तिच्या उपकंपन्यांपैकी एक टाटा इंडस्ट्रीज आहे, जी समूहाची गुंतवणूक धारण करणारी कंपनी आहे. ही कंपनी साधारणपणे टाटा समूहासाठी नवीन व्यवसाय उभारण्यासाठी पैसे गुंतवते; पण आता त्यात बदल होणार आहे.

टाटा इंडस्ट्रीजने अशा अनेक छोट्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे, जे फार मोठे होऊ शकत नाहीत; तसेच बराच काळ तोट्यात राहिले; पण अलीकडच्या काळात टाटा सन्सने अशा अनेक छोट्या व्यवसायांचे विलीनीकरण करून मोठा व्यवसाय करण्याचे काम केले आहे. जसे टाटा डिजिटल, टाटा इलेक्ट्रॉनिक्स, एअर इंडिया सर्व एअरलाइन्स आणि टाटा बॅटरीज यांचा यात समावेश आहे. आता टाटा सन्सने केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, टाटा इंडस्ट्रीज आता अशा व्यवसायांवर लक्ष केंद्रित करणार आहे जे नंतर मोठे केले जाऊ शकतात.

टाटा इंडस्ट्रीजने टाटा क्लीक, टाटा क्लीक लक्झरी, टाटा क्लीक पॅलेट आणि टाटा हेल्थ यांसारखे अनेक स्टार्टअप व्यवसाय टाटा डिजिटलमध्ये विलीन केले. याशिवाय टाटा डिजिटल ही बिग बास्केट, क्रोमा आणि १एमजीसारख्या ब्रँडची होल्डिंग कंपनी आहे. टाटा इंडस्ट्रीज नियंत्रण प्रणाली, आयटी, वित्तीय सेवा, वाहन घटक, एरोस्पेस, संरक्षण, दूरसंचार, दूरसंचार उपकरणे आणि दूरसंचार सेवा क्षेत्रात गुंतवणूक करते. सध्या या कंपनीमध्ये Inzpera Life Sciences, Tata Strategic Management Group, Tata Insights & Quants з Tata Class Edge सारख्या कंपन्या आहेत..

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा