पुणे : गेल्या काही दिवसांपासून आपण कोरोना या भयंकर महामारी सोबत लढत आहोत. कोरोना या पसरत्या रोगाने संपूर्ण जगामध्येच उच्छाद मांडलेला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी तसेच परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी देशात सर्वत्र लॉकडाउन ची घोषणा केलेली आहे. जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व काही बंद आहे.
आपण या लॉकडाउनच्या काळात घरी बसून कंटाळले असाल यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आपल्यापर्यंत विविध माध्यमातून, कृतीतून पोहचत आहे. यामध्ये विविध क्षेत्रात आपली उल्लेखनीय कामगिरी करणारे लोक यांचे फेसबुक लाईव्ह सत्र, विद्यार्थ्यांना आवश्यक अशा कृती करत आहोत.
तसेच कविता लेखन स्पर्धा, कथा लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रश्न मंजूशा अशा प्रकारच्या स्पर्धा चे नियोजन करून विद्यार्थ्यांच्या कलेला वाव देण्यासाठी साठी आणि त्यांचा कंटाळा दूर करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सर्व कार्यकर्ते काम करत आहेत. तसेच त्यांनी राबवलेल्या या उपक्रमाला अख्ख्या महाराष्ट्रातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.