आज राष्ट्रीय पत्रकार दिन, जाणून घ्या काय आहे इतिहास

पुणे, १६ नोव्हेंबर २०२०: आज “राष्ट्रीय पत्रकार दिन”संपूर्ण भारतात लोकशाहीचा विश्वास प्रस्थापित करून बनलेला चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता. समाजात होणा-या अन्याया विरूद्ध न्याय मिळवून देण्याचं कार्य पत्रकारिता करते. समाजच काय तर देशातील प्रत्येक घटनेच्या मागे या चौथ्या स्तंभाचा महत्वाचा भाग आहे.

भारतातील पत्रकारिता कानाकोप-यात पसरावी त्याची वाढ व्हावी व गुणवत्तात्मक विकास व्हावा, यासाठी केंद्र सरकारनं ४ जुलै १९६६ रोजी प्रेस काऊंसिल ऑफ इंडियाची स्थापना केली. सर्व कायदेशीर व प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यावर १६ नोव्हेंबर १९६६ रोजी काऊंसिलचं काम विधिवत सुरू झालं. तेव्हा पासून च हा दिवस ‘राष्ट्रीय पत्रकारिता दिन’ म्हणून साजरा होऊ लागला. ही प्रथा गेली ५४ वर्षे चालू आहे. ‘बेंगॉल गॅझेट’ हे साप्ताहिक इंग्रजी वृत्तपत्र कोलकात्यात १७८० साली सुरू झालं. त्यानंच भारतात पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. मराठीत बाळशास्त्री जांभेकर यांनी २१ जून १८३२ मध्ये ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू केलं. याच काळात हिंदी व अन्य भारतीय भाषांमध्ये अनेक वृत्तपत्रं सुरू झाली.

स्वतंत्र्यापुर्वी पासून पत्रकारितेनं देशात स्वतंत्र्याचा एक लढा पुकारला होता. वेळेनुसार पत्रकारितेमधे बदल होत गेला आणि आजच्या काळात भारतातील पत्रकारिता एका वेगळ्या शिगेला गेली आहे. पण, या सर्वात पत्रकारितेवर अनेक वेळा आरोप देखील करण्यात आले. ज्यामधे आधुनिक काळातील पत्रकारिता सर्व गुण संपन्न जरी झाली खरी.पण त्यामधे पोकळी देखील मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेला दिसून आली.

तरी देखील पत्रकारिता मात्र आजूनही थांबली नाही काही अपवाद वगळता आजही त्याच ताकदीने पत्रकारिता राष्ट्रीय स्तरावर होताना दिसत आहे. ज्या मधे देशातील प्रत्येक घटकांचा अभ्यास करत आजची पत्रकारिता एक महत्त्वाचा पाया रोवताना दिसत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा