अतरंगी गायक अभिनेता किशोर कुमार यांचा आज जन्म दिवस

मुंबई, ४ ऑगस्ट २०२० : एक यशस्वी पार्श्वगायक ‘किशोर कुमार’. हरहुन्नरी अभिनेता, गीतकार, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि अतरंगी गायक म्हणून चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध असलेल्या किशोर कुमार यांची आज (4 ऑगस्ट) जयंती.

चित्रपटसृष्टीतील सर्वांत यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून किशोर कुमार यांच्याकडे पाहिले जाते. खंडवा,मध्य प्रदेश मधील एका बंगाली घरात किशोर कुमार यांचा जन्म झाला. चार भावंडांमध्ये ते सर्वांत लहान होते.

किशोर कुमार लहान असतानाच त्यांचे ज्येष्ठ बंधू अशोक कुमार हे बॉलिवूडमध्ये अभिनेते म्हणून प्रसिद्धीस येऊ लागले होते. त्यामुळे लहानपणा पासूनच किशोर कुमार यांना चित्रपट आणि संगीताची आवड निर्माण झाली.

चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी पार्श्वगायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किशोर कुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक प्रसिद्ध गाणी गायली.

त्यांनी आठ भाषांमध्ये गाणी गायली : हिंदी भाषेसोबतच त्यांनी मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, भोजपुरी, मल्याळम अशा विविध भाषांमध्येदेखील गाणी गायली आहेत.

आठ फिल्मफेअर पुरस्कार : सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनासाठी त्यांना आठ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून त्या श्रेणीमध्ये हा रेकॉर्ड अद्याप कोणीच मोडू शकले नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा