नवी दिल्ली, ३१ जुलै २०२३ : इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज शेवटची तारीख आहे. मूल्यांकन वर्ष २०२३-२४ साठी ITR दाखल करण्याची ही अंतिम मुदत आहे. ही अंतिम मुदत वाढवली जाईल की नाही याबद्दल अद्याप प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ज्या करदात्यांनी अद्याप त्यांचा आयकर परतावा भरलेला नाही, ते आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर (www.incometax.gov.in)- eportal.incometax.gov.in/ वर जाऊन आयटीआर भरू शकतात.
कसा भराल आयकर परतावा?
बहुतेक लोक आयटीआर फाइल करण्यासाठी सीएची मदत घेतात. पण तुम्ही स्वतः देखील ITR भरू शकता. आयटीआर भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे तुम्हाला काहीशा अडचणी येऊ शकतात. जर तुम्ही पगारदार व्यावसायिक असाल आणि तुमचा पगार ५० लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला ITR फॉर्म-१ भरावा लागेल. किंवा शेअर मार्केटमधून तुम्हाला भांडवली नफा किंवा तोटा झाला असेल, तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारचे लाभांश उत्पन्न प्राप्त झालं असेल तर तुम्हाला ITR फॉर्म-२ भरावा लागेल.
आयटीआर भरण्यासाठी सर्व प्रथम https://eportal.incometax.gov.in/ या वेबसाईट वर जा
-यूजर आयडी (User ID) आणि पासवर्ड (Password) टाका.
-Continue या पर्यायावर क्लिक करा.
-फाइल आयकर रिटर्न (File IT Return) पर्यायावर क्लिक करा आणि मूल्यांकन वर्ष निवडा.
-ऑनलाइन (Online) पर्याय निवडा आणि नंतर वैयक्तिक (Personal) पर्यायावर क्लिक करा.
-आयटीआर-१ किंवा आयटीआर-४ फॉर्म निवडा.
-पगार घेणाऱ्या व्यक्तीला ITR ४ फॉर्मची निवड करावी लागेल.
-रिटर्न फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर, त्यात भरलेल्या प्रकारावर १३९(१) निवडा.
-पुढे, तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल ज्यामध्ये सर्व माहिती भरा.
-सर्व भरलेल्या माहितीची पडताळणी करा आणि सबमिट करा.
-फॉर्म सबमिट केल्यानंतर, त्याचा Confirmation मेसेज तुमच्या मेल आयडी आणि मोबाइल नंबरवर येईल
काल (३० जुलै) पर्यंत ६.१३ कोटी #ITR दाखल करण्यात आले आहेत. आज ३१ जुलै दुपारी १२ वाजेपर्यंत ११.०३ लाख ITR दाखल करण्यात आले आहेत आणि गेल्या १ तासात ३.३९ लाख ITR दाखल करण्यात आले आहेत. आयकर विभागाने ट्विटर वर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. कोणत्याही मदतीसाठी, कृपया orm@cpc.incometax.gov.in वर संपर्क साधा. आम्हाला मदत करण्यात आनंद होईल! असे आवाहन यावर करण्यात आलय.
परतावा मिळाल्यानंतरही ITR मध्ये करू शकता बदल
आयकर विभागाने करचोरी विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान आयकर रिटर्न भरताना करदात्यांनी आयकर विवरणात त्यांच्या उत्पन्नाची योग्य माहिती दिली पाहिजे याची काळजी घेतली जाते. अनेक वेळा करदाते बँक खात्यातील ठेवींच्या व्याज उत्पन्नाबद्दल योग्य माहिती देऊ शकत नाहीत किंवा चुकीच्या कपातीचा दावा करू शकत नाहीत. जर तुमच्यासोबतही असे घडले असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. इतकेच नाही तर आयकर विभागाकडून कमी परतावा मिळाल्यास त्याविरुद्ध अपील करण्याचीही तरतूद आहे. आयकर कायद्यांतर्गत आयकर रिटर्न भरल्यानंतरही तुम्ही तुमचा आयटीआर पुन्हा दुरुस्त करू शकता. आयकर कायद्याच्या कलम १३९(५) अंतर्गत, करदाते सुधारित आयकर रिटर्न भरून आयटीआरमध्ये झालेल्या चुका सुधारू शकतात. काल दुपारपर्यंत ६ कोटी नागरिकांनी आयकर विवरण दाखल केले असल्याची माहिती आयकर विभागाने दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे