नवी दिल्ली, २५ डिसेंबर २०२२ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी ख्रिसमसचे औचित्य साधत देशवासियांना ‘मन की बात’ कार्यक्रमामार्फत संबोधित करणार आहेत. ही या वर्षातील शेवटची ‘मन की बात’ असणार आहे.
पंतप्रधान मोदी यांनी १३ डिसेंबर रोजी एक ट्विट केले होते त्यामध्ये २०२२ ची शेवटची ‘मन की बात’ या महिन्याच्या २५ तारखेला होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच कार्यक्रमाबद्दल तुमचे विचार ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे असे म्हटले होते तसेच कोणत्या मुद्द्यावर बोलावे याबाबत सूचनाही मागितल्या होत्या.
- सकाळी ११ वाजता होणार प्रसारण
दरम्यान, आता आजपर्यंत मिळालेल्या सूचनांवर पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. मन की बात कार्यक्रम आज २५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता प्रसारित केला जाणार आहे. हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनच्या संपूर्ण नेटवर्कवर, ऑल इंडिया रेडिओ न्यूज वेबसाईट आणि न्यूजोनियर मोबाईल अॅपवर प्रसारित होणार आहे.
- या विषयांवर होऊ शकते चर्चा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान देशवासियांशी कोरोनाबाबत सावध राहण्यासाठी बोलू शकतात. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना काळजी घेण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी करु शकतात. तसेच, कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिग पाळण्याचेही आवाहन पंतप्रधान मोदी करु शकतात.
न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.