सीबीआय चौकशीचा आजचा तेरावा दिवस… काय घडले आज ?

मुंबई, २ सप्टेंबर २०२०: अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्ती यांचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांची पुन्हा चौकशी केंद्रीय ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) करीत आहे. दरम्यान, सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानीही चौकशीसाठी सीबीआय राहत असलेल्या डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये पोहोचला आहे. या प्रकरणातील सीबीआय चौकशीचा आज १३ वा दिवस आहे. दरम्यान, या प्रकरणात मनी लांड्रिंगची चौकशी करणाऱ्या एनफोर्समेंट डायरेक्टरेट (ईडी) ने सुशांतचा मित्र आणि त्याचा साथीदार वरुण माथूर याला आज मुंबईत चौकशीसाठी बोलावले आहे.
सुशांतच्या मृत्यू प्रकरणी ड्रग्स अँगलचा तपास करणार्‍या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) दोन जणांना अटक केली आहे. एनसीबीने अब्दुल बासित परिहारला मुंबईच्या वांद्रे येथून अटक केली आहे. तो सॅम्युअल मिरांडाशी संबंधित असल्याचे समजते. सॅम्युअल मिरांडावर मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्या सांगण्यावरून ड्रग्स खरेदी केल्याचा आरोप आहे. या व्यतिरिक्त, जैद विलात्राही अटक करण्यात आली होती.

 मंगळवारी रियाची नाही झाली चौकशी

मंगळवारी रिया चक्रवर्तीच्या घरच्यांची प्रथमच चौकशी केली गेली. या दरम्यान रियाचे वडील इंद्रजित आणि आई संध्या यांची चौकशी एजन्सीने सुमारे आठ तास चौकशी केली. याशिवाय रियाचा भाऊ शौविक याच्यावर पुन्हा एकदा चौकशी केली गेली. मंगळवारी रियाला सीबीआयने चौकशीसाठी बोलावले नाही. ती आतापर्यंत चार वेळा सीबीआयसमोर हजर झाली आहे. सीबीआयने आतापर्यंत जवळपास ३५ तास रियाकडे चौकशी केली आहे. याशिवाय सुशांतचा कूक नीरज सिंग, जवळचा मित्र सॅम्युअल मिरांडा, कर्मचारी केशव आणि  सिद्धार्थ पिठानी याचीही सीबीआयने चौकशी केली. या प्रकरणात यापूर्वी त्यांची चौकशी करण्यात आली होती.

 ईडीने पुन्हा हॉटेल व्यवसायिक गौरव आर्यची चौकशी केली

दुसरीकडे, एनफोर्समेंट डायरेक्टरेट या प्रकरणातील मनी लांड्रिंगचा तपास करत आहे. मंगळवारी ईडीने पुन्हा हॉटेल व्यवसायिक गौरव आर्यची चौकशी केली. रिया चक्रवर्तीशी संबंधित ड्रग्स उघडकीस आल्यानंतर ईडीने गोव्यातील हॉटेल व्यवसायिकालाही चौकशीसाठी बोलावले. रविवारी तो गोव्याहून मुंबईला पोहचला. रिया आणि हा हॉटेल मालक यांच्यातील २०१७ मधील एक चॅट ईडीला सापडली आहे. यावरून असे दिसून येते की रिया केवळ सुशांतसोबतच राहत नव्हती, तर त्यापूर्वी खूप आधीपासून अंमली पदार्थांच्या व्यसनात अडकली होती. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाबरोबरच्या त्यांच्या गप्पांबद्दल त्याच्यावर प्रश्न विचारण्यात आले आहेत. आर्य म्हणतो की सुशांत प्रकरणात त्याचा काही संबंध नाही. तो सुशांतला कधीच भेटला नव्हता, परंतु २०१७ मध्ये रियाला भेटला

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा