आज युक्रेनचा स्वातंत्र्य दिन, मात्र लोकांच्या मनात भीती

66

रशिया, २४ ऑगस्ट २०२२: २४ ऑगस्ट १९९१ युक्रेन सोव्हिएत युनियनपासून वेगळे स्वतंत्र राष्ट्र बनले. आज युक्रेनचा स्वातंत्र्यदिन आहे. दरवर्षी हा दिवस थाटामाटात साजरा केला जातो, परंतु यावेळी उत्सवाऐवजी युक्रेनियन लोकांच्या मनात भिती पसरली आहे.

राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना भीती ?

राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर यांना वाटते की या दिवशी रशिया काहीतरी भयंकर हल्ला करू शकतो. या २४ फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. या अर्थानेही हा दिवस महत्त्वाचा आहे कारण आज युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाला सहा महिने पूर्ण होत आहेत.

गेल्या वर्षी या दिवशी युक्रेनमध्ये लष्करी परेड नेत्रदीपक पद्धतीने काढण्यात आली होती आणि युद्धविमानांसह आकाशात फ्लाय मार्च करण्यात आला होता. परंतु या दिवशी कोणतीही परेड नाही.

युक्रेनवर मोठा हल्ला करण्यासाठी रशियाकडे दोन कारणे

पहिले म्हणजे सहा महिन्यांत त्यांना युद्धातून अपेक्षित परिणाम मिळालेला नाही, दुसरे- पुतिन यांचे जवळचे सहकारी अलेक्झांडर दुगिन यांची मुलगी दर्या डुगिन कार स्फोटात ठार झाली. दर्याच्या मृत्यूमागे युक्रेनवर आरोप केले आहे.

युक्रेनने दर्याच्या हत्येत आपली कोणतीही भूमिका नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण आपल्या जवळच्या मित्राच्या मुलीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन चांगलेच संतापले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: