आज अखेर सूर्य अस्ताला गेला….

आज कार्तिकी एकादशी , विठ्ठलाच्या नामघोषाच्या गजरात अखेर भवानी मातेने शिवशाहीर बाबासाहेबांना स्वर्गात बोलावून घेतलं. १९२२ साली जन्म झालेल्या बाबासाहेब पुरंदरे यांनी १५ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला आणि शिवशाहीर परंपरा अखेर खंडीत झाली. शिवभक्त म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाबासाहेबांवर आज सकाळी १०.३० वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नुकतेच बाबासाहेब यांनी वयाची १०० वर्षे पूर्ण केली होती. त्यानिमित्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार करण्यात आला होता.

पण याच शिवशाबीराला सन्मानपूर्व निरोप देताना वैकुंठ उदासीन होते. त्वेषाने धगधगणारी चिता आज अत्यंत लीन होती. अखेरीस शांत चित्ताने तिने बाबासाहेबांना अखेरचा निरोप दिला.शासकीय इतमामात त्यांना निरोप देऊन बाबासाहेबांना स्वर्ग गमनाची जणू परवानगी मिळाली असावी.

अनेक राजकीय नेते, अभिनेते, निकटवर्तीय यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाबासाहेबांनाआदरांजली वाहिली. शिवशाहीर यांचे कार्य शब्दात सांगतां येणार नाही. असे शब्दोच्चार पंतप्रधानांनी सांगितले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे , अजित पवार सुप्रिया सुळे, यांनी अंत्यदर्शन घेतले. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी यावेळी आम्हा कुटूंबियांचा आधार गेला म्हणत आदरांजली वाहिली.

नीलम गोऱ्हे यांनी अंत्यदर्शन घेतले. नितीन गडकरी यांनी आदरांजली वाहिली.
शिवराय हाच देव, शिवराय हाच श्वास असं म्हणत बाबासाहेब इतिहास जगले. तोच त्यांचा श्वास होता. आज हा श्वास अखेर थांबला आणि शिवशाहीर नावाच्या सूर्याचा अस्त झाला.

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा