Manikrao Kokate Hearing: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ३ मार्च पासून सुरुवात झाली असून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा श्रीगणेशा महायुती सरकारच्या नेत्याच्या राजीनाम्याने झाला. नुकतीच काल धनंजय मूडेंची संतोष देशमुख हत्या प्रकरणी विकेट पडली. त्यामध्येच आता अधिवेशनापूर्वीच माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर धरू लागला आहे. यामुळे कोकाटे यांची धाकधुक वाढतानाचे चित्र दिसत आहे. कृषि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सर्व प्रकरणावर आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सकाळी ११.३० वाजता सुनावणी होणार आहे. कोर्टाच्या निर्णयावर त्यांची आमदारकी आणि मंत्रीपद ठरणार असून अजित पवार गटाची पुन्हा एकदा विकेट पडणार का ? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
काय आहे घटनाक्रम
माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधु विजय कोकाटे यांनी १९९५ मध्ये १० % योजनेअंतर्गत आर्थिक व दुर्बल घटकांसाठी असलेल्या घरांसाठी बनावट कागद पत्रे सादर केली अशी तक्रार तत्कालीन अपक्ष आमदार आणि मंत्री तुकाराम दिघोळे यांनी दाखल केली होती.त्यावेळी माणिकराव कोकाटे आणि बंधु विजय कोकाटे यांना २० फेब्रुवारी रोजी दोषी ठरवले होते व त्यांना प्रत्येकी २ वर्षे शिक्षा आणि ५० हजार रुपये दंड ठोठवला होता. यानंतर पुढे नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कोकाटे बंधूंच्या शिक्षेला २४ फेब्रुवारी २०२५ रोजी तात्पुरती स्थगिती देऊन त्यांची १ लाखाच्या जामीनावर सुटका केली.
त्यानंतर कोकाटे यांनी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात शिक्षेला मिळावी यासाठी विनंती केली होती. यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, सर्व कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर पुढील सुनावणी ५ मार्च रोजी करण्यात येईल. अखेर आज माणिक राव कोकाटे यांच्या प्रकरणावर सुनावणी होणार असून त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळते का ? आणि जर दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास त्यांची आमदारकी धोक्यात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर