संयुक्त किसान मोर्चाची आज बैठक, एमएसपी कायद्याच्या मागणीवर अंतिम रोडमॅप बनू शकतो

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2021: तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असली तरी शेतकरी रस्त्यावर उभे आहेत.  संपूर्ण दिल्ली रोखण्याची शेतकरी संघटनांची योजना आहे.  29 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील मोकळ्या रस्त्यांवर मोठी ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे.  त्यामुळं शनिवारी संयुक्त किसान मोर्चाने 9 सदस्यीय समितीची बैठक बोलावलीय.  या बैठकीत एमएसपी कायद्याच्या मागणीवर अंतिम रोडमॅप तयार केला जाण्याची शक्यता आहे.
 शनिवारी सकाळी 11 वाजता होणारी ही बैठक अनेक अर्थानं महत्त्वाची असल्याचं सांगण्यात येत आहे.  बैठकीत शेतकरी आंदोलनाबाबत आगामी रणनीती ठरवली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.  त्याचवेळी दुपारी 12 वाजता संयुक्त किसान मोर्चाच्या पूर्ण संमेलनाची बैठक होणार आहे.  यामध्ये राजस्थान, हरियाणा आणि इतर राज्यांतील आंदोलन प्रमुखांसह सर्व कृषी संघटनांच्या नेत्यांना सहभागी होण्यास सांगण्यात आलंय.
सूत्रांवर विश्वास ठेवला तर, एमएसपी कायद्याच्या मागणीचा अंतिम रोडमॅप संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत तयार होण्याची शक्यता आहे.  शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालं आहे.  अनेक नाट्यमय वळणं पाहिलेली ही चळवळ अजूनही सुरू आहे.  आता शेतकरी आंदोलनाच्या व्यापक विस्ताराची संपूर्ण रणनीती तयार करण्यात आली आहे.  जोपर्यंत एमएसपीवर कायदेशीर हमी मिळत नाही, तोपर्यंत दिल्लीला घेराव सुरूच राहील, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा