टॉम क्रुज- अंतराळात जाऊन शूट करणारा असेल पहिला अभिनेता

पुणे, ११ ऑक्टोंबर २०२२: हॉलिूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी असणारा अँक्शन हिरो टॉम क्रुज, नेहमीच त्याच्या प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन घेऊन येत असतो. आजपर्यंत केलेले सर्व स्टंट्स त्याने स्वतः केले आहेत.

मिशन इम्पॉसिबल साठी बुर्ज खलिफा चढण्यापसून, विमानाला लटकण्यापासून ते अगदी अमेरिकन फायटर प्लेन उडवण्यापर्यंत बरेच स्टंट्स टॉम क्रुज ने केले आहेत.

पण ह्या वेळी टॉम जो अनोखा कारनामा करणार आहे, तो कोणी पहिला केला नसेल आणि त्याचा विचार देखील केला नसेल. ‘टॉप गन’ सिक्वेल च्या यशाने टॉम ने सर्वात मोठा विजय मिळवला. तेव्हाच या ब्लॉकबस्टर स्टार ला एक कल्पना सुचली जी पूर्णतः जगावेगळी होती.

टॉम चां हा ॲडवेंचर सिनेमा स्पेस वरील कथेवर आधारीत असणार आहे. आजवर आपण अनेक फिल्म्स मध्ये अंतराळ पाहिलं असेल. पण अंतराळात जाऊन शूट करणारी ही पहिलीच फिल्म असेल.

हॉलिूडमधील टॉप फिल्ममेकर, डग लिमन यांची ही फिल्म आहे. या फिल्म ची खासियत अशी की याच शूटिंग हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वर करण्यात येणार आहे.
क्रुज अणि लीमन यांनी युनिव्हर्सल फिल्म एन्टरटेनमेंट ग्रुप यांच्याशी संपर्क साधला आणि या फिल्म बद्दल माहिती देताना असे सांगितले की, टॉम क्रुज या फिल्म मधे रॉकेट घेऊन इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वर जाणार आहे. याची अधिक माहिती देताना ते म्हणाले की, हा प्रोजेक्ट पूर्णपणे जमिनीवरच शूट होणार आहे. फक्त त्या कलाकाराचे दिवस वाचवण्यासाठी अंतराळात जायची गरज पडणार आहे. यात असे दाखवले जाणार आहे की, संपूर्ण जगाला वाचवणारा टॉम एकमेव व्यक्ती असेल.

इंटरनॅशनल स्पेस स्टेशन च्या बाहेर स्पेस वॉक करणारा टॉम पहिला नागरिक असणार आहे. तर स्पेस मधे जाऊन शूट करणं हे खूपच चॅल्लेंजिंग असेल. या फिल्म च शूटिंग पूर्ण झाल्यावर बिग स्क्रीन वर बघणं एक वेगळा एक्सपीरीएन्स असेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा