टोमॅटो पाठवू, आधी पाकव्याप्त काश्मीर सोडा

नवी दिल्ली (वृत्त संस्था): मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाकिस्तानामधील टोमॅटोचे भाव पाहून मदतीसाठी हात पुढे केल्याचे दिसून येत आहे. मात्र त्यासाठी ‘पीओके’ला सोडण्यासाठी सांगितले आहे.
झाबुआमधील शेतकऱ्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना तसा संदेश पाठवला आहे. त्यात म्हटले आहे की, माफी मागून पाकव्याप्त काश्मीर सोडल्यास येथील शेतकरी टोमॅटो पाठवतील.
दरम्यान पाकिस्तानमध्ये काही दिवसांपासून टोमॅटोची ४०० ते ५००रुपये किलो दराने विक्री होत आहे.
झाबुआ जिल्ह्यातील पेटलवादच्या शेतकऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी वाघा बॉर्डरद्वारे पाकिस्तानामध्ये टोमॅटो पाठवायची तयारी दाखविली. मात्र त्यासाठी पाकिस्तानने पीओके सोडले पाहिजे अशी अट घातली आहे.
भारतीय किसान यूनियनच्या झाबुआ येथील शाखेच्यावतीने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र पाठवले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा