सणासुदीच्या दिवसांतही टोमॅटोच्या दरात प्रचंड चढ-उतार होण्यामुळे शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वीच १०० रुपये किलो पर्यंत गेलेले टोमॅटोचे दर आता पुन्हा कोसळले आहेत. मुंबईतील आंदोलन आणि बाहेरच्या राज्यांतून होणाऱ्या पुरवठ्यामुळे दरात घट झाली आहे.
या अस्थिरतेमुळे ग्राहक आनंदी असले तरी, शेतकरी उत्पादन खर्चही वसूल करू शकत नाहीत. यावर उपाय म्हणून तज्ज्ञ आधुनिक तंत्रज्ञान, योग्य वाणांची निवड आणि खत व्यवस्थापन यांचा वापर करण्याचा सल्ला देत आहेत.
याशिवाय, दलालांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजार समित्यांनी कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचा फायदा सुरक्षित राहू शकेल आणि बाजार स्थिर राहील.
न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले












































