उद्या होणार अमेरिकेत अध्यक्षपदासाठी निवडणूका

वॉशिंग्टन, २ नोव्हेंबर २०२०: सध्या अमेरिकेत देखील राजकीय रिंगण तापलेले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेतही प्रचार जोरानं सुरू होता. मंगळवारी अमेरिकेत अध्यक्षपदासाठी निवडणुका होणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि बिडेन यांच्यात सध्या अध्यक्षपदावरून आमने सामने सुरू आहे. डेमोक्रॅट पार्टी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कोरोनाव्हायरस वरुन आलेल्या अपयशाबाबत टीका करत आहेत तर दुसरीकडं डोनाल्ड ट्रम्प देखील विरोधी पक्षावर टीका करताना कमी पडताना दिसत नाहीत. मागच्या वेळेप्रमाणे यंदाही डोनाल्ड ट्रम्प सर्वेक्षणामध्ये मागं पडताना दिसत आहे परंतु, कोणत्याही क्षणी स्थिती बदलण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे.

अमेरिकेतील निवडणुकीत भारतीयांची महत्वाची भूमिका

अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच भारतीयांना इतकं महत्त्व प्राप्त झालं आहे. होणाऱ्या निवडणुकीत भारतीय आपली महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत. त्यामुळं भारतीयांचा झुकाव ज्या नेत्याकडं असंल सहाजिकच मतदानाच्या संख्यामध्ये मोठा फरक पडणार आहे. तसं बघितलं तर अमेरिकेतील १६ राज्यांमध्ये भारतीयांची संख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या एक टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. पण, खास करून ज्या राज्यांमध्ये चुरशीचा सामना होणार आहे त्या आठ राज्यांमध्ये भारतीयांची संख्या १३ लाख आहे. त्यामुळं याआधी देखील आपण बघितले आहे की नरेंद्र मोदी यांनी देखील अमेरिकेतील आपल्या भेटीमध्ये ट्रम्प यांना समर्थन देण्यासाठी अमेरिकेतील भारतीयांना आव्हान केलं होतं. हाऊ डी मोदी हा कार्यक्रम किती भव्य आणि दिव्य केला होता हे आपणा सर्वांना ठाऊक आहे आणि या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी अस ंदेखील म्हणाले होते की ‘अब की बार ट्रम्प की सरकार’.

अमेरिकेत एकूण २४ कोटी मतं

अमेरिकेत एकूण २४ कोटी मतदार आहेत. २८ ऑक्टोबरपर्यंत ७.५ कोटीपेक्षा जास्त मते पडली आहेत. २०१६ मध्ये ५ कोटीहून अधिक लोकांनी अलीं वोटिंग मतदान केलं होतं. निवडणुकीतील तज्ज्ञांचं म्हणणं आहे की मागील वेळेप्रमाणं यावेळेसही सायलेंट वोटर किंगमेकर असतील. मतदानासाठी दोन पर्याय आहेत, एक म्हणजे मेल किंवा अली॔ वोटिंग आणि दुसरा पर्याय म्हणजे मतदान केंद्रांमध्ये जाऊन मतदान करणं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा