मुंबई, 18 जानेवारी 2022: काही दिवस मंदावल्यानंतर पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. समोर अर्थसंकल्प असून तोपर्यंत बाजारात तेजी राहण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव काही क्षेत्रांवर दिसत असला तरी पण या सगळ्यामध्ये गेल्या वर्षभरात सर्व शेअर्सनी उत्कृष्ट रिटर्न दिलाय. चला अशा काही शेअर्सबद्दल जाणून घेऊया ज्यांनी एका वर्षात उत्कृष्ट रिटर्न दिलाय.
Deepak Nitrite :
या शेयरने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. दीपक निट्रेडचा (Deepak Nitrite share) शेअर एक वर्षापूर्वी 18 जानेवारीला 1011 रुपये होता, जो आता 17 जानेवारी 2022 ला 2658 रुपये झालाय. त्याची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत 3000 रुपयांपेक्षा जास्त आहे. या शेअरने एका वर्षात 162 टक्के परतावा दिलाय.
Adani Green:
तसं पाहता, अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांनी गेल्या एका वर्षात उत्कृष्ट रिटर्न दिलाय. पण अदानी ग्रीन एनर्जीचा शेयर एका वर्षात दुप्पट झालाय. गेल्या वर्षी 18 जानेवारीला अदानी ग्रीनचा शेअर 949 रुपयांवर होता, जो 17 जानेवारी 2022 रोजी 1827 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे.
Dixon Technologies:
या कंपनीच्या शेअरनेही एका वर्षात उत्कृष्ट रिटर्न दिलाय. डिक्सन टेक्नॉलॉजीजचा शेअर 17 जानेवारीला 5,388 रुपयांवर बंद झाला. तर एक वर्षापूर्वी म्हणजेच 18 जानेवारी 2021 रोजी त्याच्या शेअरची किंमत 3000 रुपयांच्या जवळपास होती.
Tata Motors:
लार्ज कॅप कंपनी टाटा मोटर्सने एका वर्षात भरघोस रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना खूश केलंय. टाटा मोटर्सचा शेअर 17 जानेवारीला 524 रुपयांवर बंद झाला. तर एक वर्षापूर्वी 18 जानेवारी 2021 रोजी या शेअरची किंमत 245 रुपये होती. म्हणजेच एका वर्षात गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट झालाय.
State of Bank India (SBI):
महाकाय सरकारी बँक SBI च्या स्टॉकने देखील एका वर्षांमध्ये उत्कृष्ट रिटर्न दिलाय. गेल्या वर्षी 18 जानेवारी रोजी या बँकेचा शेयर 294 रुपये होता, तो आता 514 रुपये झाला आहे.
KPIT Technologies:
या स्टॉकने एका वर्षात जबरदस्त परतावा दिला आहे. सध्या KPIT Technologies चा शेयर 732 रुपये आहे. पण वर्षभरापूर्वी या शेयरची किंमत केवळ 132 रुपये होती. या शेयरने एका वर्षात 453 टक्के रिटर्न दिलाय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे