येत आहे Toyota Century ची सेडान मॉडेल न्यू SUV

पुणे, ३० जून २०२३ : जपानची कार उत्पादक कंपनी टोयोटाने अलीकडेच त्यांच्या प्रसिद्ध MPV ‘टोयोटा वेलफायरचं’ नेक्स्ट जनरेशन मॉडेल जागतिक बाजारपेठेत सादर केलं. टोयोटा सेंच्युरी कंपनीने १९६७ मध्ये पहिल्यांदा आपल्या कंपनीची सेडन कार सादर केली होती. त्यानंतर त्यामध्ये अनेक गोष्टी अपडेट करण्यात आल्या आहेत. १९६७ पासून ते आतापर्यंत जपानच्या बाजारपेठेत टोयोटा sedan गाड्यांची विक्री सुरू होत आहे.

जपानची कार उत्पादक कंपनी टोयोटाने वेलफायरच सोबतच आता नवीन ऑफर म्हणून सेंच्युरी लाईन-अप परत करण्याचेही आव्हान केले आहे. साठच्या दशकात कंपनीनं Toyota Century सेडन पहिल्यांदाच सादर केली पण आता कंपनी येणाऱ्या सेडन कार ला SUV म्हणून सादर करणार आहे. सेंचुरी एसयूव्ही या वर्षाच्या अखेरीस जागतिक बाजारात लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे.

नवीन येणारी सेंचुरी एसयूव्ही (Century SUV) ही लोकप्रिय सेंच्युरी सेडन नंतरची दुसरी कार असेल. ही sedan कार प्रामुख्यानं पाहिल्यांदा जपानमध्ये विकली जायची. पण आता ही SUV जपाननंतर जागतिक बाजारात लाँच होणार आहे. ही एक प्रीमियम SUV असेल जी ब्रँडच नेटवर्थ वाढवण्यात महत्त्वाची भूमिका ठरेल. सेंच्युरी ब्रँड जपानच्या बाजारपेठांमध्ये आधीपासूनच खूप लोकप्रिय आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही एक लग्झरी वैशिष्ट्य असणारी आणि एडवांस तंत्रज्ञानान परिपुर्ण अशी मोनोकॉक एसयूव्ही असेल. त्यामुळे, ऑफ-रोडिंग व्हेईकलऐवजी सिटी राईडसाठी ती अधिक योग्य ठरेल. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये या SUV ची फ्रंट ग्रिल पाहून नक्कीच रोल्स रॉयस डोळ्या समोर येईल.

टोयोटा ग्रँड हाईलँडर एसयूव्हीमध्ये असलेल्या मोनोकॉक आर्किटेक्चरचा वापर टोयोटा या नव्या एसयूव्हीमध्ये करण्याची शक्यता आहे. टोयोटा सेंच्युरी एसयूव्हीमध्ये देण्यात येणारा व्हीलबेस केबिन स्पेसचा विचार करुन देण्यात आलाय. विशेष बाब म्हणजे कंपनीन अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु सोशल मीडियावर या विषयी माहिती उपलब्ध झालीय. ग्राहकांना या SUV मध्ये दमदार इंजिनसह अनेक क्लासी फिचर्स मिळू शकतात या SUV ची लांबी अंदाजे ५ .२ मीटर आणि रुंदी सुमारे २ मीटर असेल Toyota Century मध्ये कंपनी V12 पेट्रोल इंजिनचा वापर करण्याची शक्यता आहे. परंतु अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. सध्या ही SUV सुरुवातीच्या टप्प्यात आहे, त्यामुळे वेळोवेळी अनेक अपडेट्स मिळतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा