बाजारात लवकरच ‘टोयोटा ची वेलफायर’ येणार

पुणे १९ जून २०२३: भारतीय बाजारपेठेत टोयोटा मोटर, लवकरच MPV या नविन सेगमेंटचा विस्तार करणार आहे. टोयोटा कंपनीच्या येणाऱ्या नवीन कार ‘टोयोटा वेलफायरचे’ माहितीपत्रक ऑनलाइन लीक झाले, ज्यामध्ये टोयोटाच्या या लक्झरी एमपीव्हीचे जास्त फीचर्स उघड झाले. या आधीही आगामी येणाऱ्या काही कारचे फोटो समोर आले, ज्यावरून MPV डिझाइनबद्दल माहिती कळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘टोयोटा वेलफायर’ दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहे. एक ‘झेड प्रीमियर’ आणि दुसरे ‘एक्झिक्युटिव्ह लाउंज’, टोयोटा वेलफायरच्या टॉप मॉडेलची किंमत सुमारे १ कोटी रुपये असू शकते. भारतात, टोयोटा वेलफायरचा उच्च-विशिष्ट प्रकार CBU म्हणजे Completely Built Up (पूर्णपणे बिल्ट युनिट) अशा प्रकारे आयात केला जाईल आणि त्या नंतर भारतीय बाजारात खरेदीदारांना विकला जाईल. बिल्ट युनिट (CBU) कार इतर देशांतून आयात केल्या जातात. भारतीय बाजारपेठे येणाऱ्या कार पूर्णपणे असेंबल पद्धतीने आयात करण्यात येतात तसेच अनेक लक्झरी कार पूर्णपणे तयार केलेल्या युनिट्स म्हणून देखील आणल्या आणि विकल्या जातात. पण ते खरेदी करण्यासाठी उत्पादन शुल्काबरोबरच, इतर अनेक प्रकारचे कर भरावे लागतात. नवीन टोयोटा वेलफायर आधीच्या मॉडेलपेक्षा अधिक आकर्षक आणि स्पोर्टी दिसते. टोयोटा वेलफायर भारतीय बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या ‘लेक्सस’ सारखी दिसते.

टोयोटा वेलफायर ची हेडलाइट्स बॉनेटसह वेगळ्या प्रकारे एकत्रित आहेत, ज्यामध्ये खाली DRL लावलेत, पुढच्या बाजूला क्रोम स्ट्रीपसह एयर इंटेक्स ही देण्यात आले असुन टोयोटा वेलफायरला मोठ्या आकाराची इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळते. स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, रियर एसी व्हेंट्ससह अनेक फीचर्स आहेत. तसेच कारच्या केबिनला वुड इन्सर्टसह ब्लॅक फिनिश देण्यात आले आहे.

टोयोटा वेलफायरच्या लीक झालेल्या माहितीपत्रकात इंजिनच्या क्षमतेचा उल्लेख नाही. वेलफायरमध्ये इनोव्हा हायक्रॉससारखे हायब्रिड इंजिन देण्याची शक्यता आहे, पण ते आकाराने थोडे मोठे देखील असू शकते. ट्रान्समिशनसाठी, वेलफायरचे इंजिन CVT ( continuously variable transmission) गिअरबॉक्सशी जोडले जाणे अपेक्षित आहे. हे इंजिन AWD (All-Wheel Drive) प्रणालीद्वारे सर्व चार चाकांना पॉवर पाठविण्यास सक्षम असेल. जागतिक बाजारपेठेत टोयोटा वेलफायरची किंमत ३९.३४ ते ५२.१७ लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते.

न्युज अनकट प्रतिनिधी- वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा