टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांचे निधन

नवी दिल्ली; ३० नोव्हेंबर २०२२ टोयोटा किर्लोस्कर मोटारचे उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते ६४ वर्षांचे होते. कंपनीनेच मंगळवारी या संदर्भातील माहिती दिली आहे.

टोयोटो कंपनीने निवदेनात म्हटले की, या दु:खाच्या वेळी, सर्वांनी त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना करावी अशी आम्ही विनंती करतो. आम्ही त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना आमच्या मनापासून सहानुभूती देतो. विक्रम एस किर्लोस्कर यांच्या पार्थिवावर बुधवारी बेंगळुरू येथील हेब्बल स्मशानभूमीत दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी गीतांजली किर्लोस्कर आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे.

विक्रम एस. किर्लोस्कर हे १८८८ मध्ये सुरू झालेल्या किर्लोस्कर समूहाचे चौथ्या पिढीतील सदस्य होते. टोयोटा कार भारतात लोकप्रिय करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. किर्लोस्कर समूह पंप, इंजिन आणि कंप्रेसर आणि इतर संबंधित उत्पादने तयार करतो. २०१९ – २० मध्ये ते भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा