रस्त्याच्या दुतर्फा कामामुळे वाहतूक कोंडी

दौंड, दि. ३० जून २०२०: दौंड तालुक्यातुन जाणाऱ्या मनमाड बेंगरूळ महामार्गाचे काम प्रगती पथावर असुन एकाच वेळेस रस्त्याच्या दोन्ही बाजुने कामे सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. जुने डांबरीकरण उखडून नव्याने सिमेंट रस्ता करण्याचे काम सुरु आहे परिणामी सुरुवातीला मुरुमिकरण प्रक्रीयेने अवजड वाहतुकीला समस्या निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे.

कुरकुंभच्या मुख्य चौकातील रस्ता हा एका बाजूने पूर्णपणे खोदल्याने देखील मोठ्या समस्यांना स्थानीक वाहतूक व ग्रामस्थांना सामना करावा लागत आहे.
रस्ता खोदल्यावर अनेक दिवस काम प्रलंबीत राहत असल्याने वाहतुक, व्यवसाय व इतर समस्या निर्माण होऊन अपघाताच्या शक्यता बळावत आहेत. नुकतेच या रस्त्याचे काम दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांच्या सूचनेनुसार जवळपास दोन वर्षाच्या अंतराने सुरु करण्यात आले असल्याने सर्वसामान्य नागरीक विरोध करण्यास पुढे येत नाही मात्र समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वच प्रकारची कोंडी निर्माण होत आहे.

बारामती जाण्यासाठी सध्या निम्म्याहून जास्त वाहतूक रोटी घाटाच्या मार्गाने जात असली तरी अवजड वाहने व नवीन प्रवास करणाऱ्या वाहनांना त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून मिळालेल्या परवानगीने अडथळा असणाऱ्या ठिकाणी कामे अतीशय जलद गतीने सुरु करण्यात आली आहेत. परिणामी अन्य ठिकाणच्या खोदलेल्या कामाकडे सध्या दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे आढळून येत आहे.कायदेशीर प्रक्रीयेने विरोध करण्याच्या पोलीसांच्या सूचनेमुळे शेतकरी व इतर बाधीत जागा मालक सध्या मवाळ भूमिकेच्या अवस्थेत असल्याचे दिसते.अनेकांच्या भरपाईचा प्रश्न कायम राहिल्याने यामध्ये नक्की कोणाची बाजु खरी हे पाहणे आवश्यक झाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: रिजवान शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा