वाहतुक पोलिस व मदतनीस लाच घेताना रंगेहाथ पकडले

पुणे, ७ सप्टेंबर २०२२:चाकण वाहतूक विभागाच्या ट्रॉफीक कॉन्स्टेबल सह मदतनिसाला सात हजारांची लाच घेताना पकडले असल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी दिली आहे. चाकण वाहतूक शाखेतील भ्रष्टाचार यामुळे चव्हाट्यावर आला आहे.

चाकण मधील घटनेबाबत माहिती देताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, पुण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगीतले की, चाकण वाहतूक विभागाच्या ट्रॉफीक कॉन्स्टेबलने एका मोटरसायकल स्वाराला वाहतूक नियम तोडल्यामुळे मंगळवारी ६ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ५ ते ६ वा. च्या दरम्यान पकडले. या ट्रॉफीक कॉन्स्टेबल व त्याच्या मदतनीसाने या मोटरसायकल – स्वाराकडून करवाई न करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितली.

त्यामुळे मोटरसायकल स्वाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्याकडे बाबत तक्रार केली आहे. तोडजोडीनंतर लाचेची रक्कम कमी करून सात हजार रुपये करण्यात आली. ही सात हजार रुपये रक्कम स्वीकारताना ट्राफिक पोलीस व त्याच्या मदतनीसाला ताब्यात घेण्यात आले आहे. या दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. या कारवाई मुळे या चर्चेवर शिक्कामोर्तब झाला आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत चाकण पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा