G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ७ आणि ८ सप्टेंबर रोजी दिल्लीत वाहतुकीवर निर्बंध

नवी दिल्ली, २५ ऑगस्ट २०२३ : G20 शिखर परिषदेदरम्यान दिल्लीत वाहतूक निर्बंध लागू केले जाणार आहेत. दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी ट्रॅफिक अॅडव्हायझरी जारी केली आहे. दिल्लीतील वाहतुकीवर चार दिवस परिणाम होणार आहे. ही बंदी ७ आणि ८ मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. यासंदर्भातील माहिती विशेष सीपी ट्रॅफिक एस.एस.यादव यांनी दिली.

G20 शिखर परिषदेदरम्यान दिल्ली पोलिसांनी, ७ आणि ८ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणाऱ्या निर्बंधांसह तपशीलवार वाहतूक सल्ला जारी केला आहे आणि तो १० सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत कायम राहील. तपशीलवार वाहतूक सल्ल्यामध्ये, दिल्ली पोलिसांनी विविध सेवा कशा वापरायच्या याबद्दल तपशीलवार सूचना जारी केल्या आहेत. बस सेवा रिंगरोडच्या पलीकडे उपलब्ध असतील, NDMC क्षेत्र हे नियंत्रित क्षेत्र असेल जेथे बस सेवा उपलब्ध नसतील. विशेष सीपी वाहतूक एस.एस यादव यांनी ही माहिती दिली.

स्पेशल सीपी ट्रॅफिकने माहिती दिली की, एनडीएमसी क्षेत्रातील व्यावसायिक आस्थापने बंद राहतील. दिल्लीच्या इतर भागातील आस्थापने खुली राहतील. मात्र, नवी दिल्लीकडे यायचे असल्यास मेट्रो सेवेचा वापर करावा असे दिल्ली पोलिसांनी लोकांना आवाहन केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा