तळेगाव दाभाडे, २६ जुलै २०२३ : मुंबईहून पुण्याकडे येणारी रेल्वे वाहतूक आज सकाळपासून ठप्प झाली आहे. कारण तळेगाव दाभाडे येथे एका मालगाडीचे इंजिन निकामी झाले आहे. त्यामुळे सदर रेल्वे वाहतूक ही पूर्णपणे विस्कळित झाली आहे. डेली अप डाऊन करणाऱ्या चाकरमान्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मूंबई येथून पूण्याच्या दिशेने येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या एका मागे एक थांबवण्यात आल्या आहेत. सर्व प्रवासी पर्यायी मार्ग शोधत आहेत. रेल्वे प्रशासनाने निकामी झालेले इंजिन रुळावरून बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत होईल. या घटनेचा परिणाम संपूर्ण रेल्वे वेळापत्राकावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रेल्वे प्रशासनाने ही वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करावी अशी प्रवाश्यांकडून मागणी होत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर