इंदापूर तालुक्यातील शिक्षकांना आरोग्य विभागाकडून प्रशिक्षण

इंदापूर, दि. ४मे २०२०: सध्या पूर्ण जगभर कोरोनाने हाहाकार माजविला आहे. यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागासह पोलीस प्रशासन अथक परिश्रम घेत आहेत. परंतू अपुऱ्या मनुष्यबळाअभावी कोरोनासोबत दोन हात करणे शक्य नसल्याने प्रशासनाने आरोग्य विभागाच्या मदतीला अशा कर्मचा-यांना सोबत घेतले आहे .

त्यांना त्याबाबतचे प्रशिक्षणही दिले गेले , या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथे सोमवार (दि.४) रोजी माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांना आणि आणि प्राथमिक शाळेतील शिक्षकांना लोणी देवकर येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रशिक्षण देण्यात आले.

यामध्ये प्रामुख्याने बाहेरगावाहून आलेली व्यक्ती तसेच प्रत्येक घरी जाऊन घरामधील कोणाला सर्दी, खोकला, ताप किंवा कोणाकडे नातेवाईक आले आहेत, याची चौकशी करणे आणि त्याबद्दलची माहिती संबंधित ग्रामसेवक सरपंच तलाठी किंवा आरोग्य सेवकांना देणे तसेच शक्य तेथे वाड्या वस्त्यांवर जाऊन कोरोना विषयी जनजागृती करणे असे या प्रशिक्षणात शिक्षकांना सांगितले.

यावेळी लोणी देवकर ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल तोरवे, ग्रामसेवक तुकाराम शिंदे, लोणी देवकर आरोग्य केंद्राच्या डॉ. सुषमा जलमकर ,आरोग्य सेवक भाऊसाहेब खबाले आणि उपसरपंच विजय डोंगरे आदींसह प्रशिक्षणार्थी शिक्षक उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा