मध्यप्रदेश, बिहार साठी आज पुण्यातून रेल्वे गाड्या

पुणे, दि. १७ मे २०२०: २३ मार्च पासून सुरू झालेल्या लॉकडाऊन मुळे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित मजूर अडकले होते. त्यात पुणे आणि मुंबई या शहरांमध्ये त्यांची संख्या जास्त आहे. दोन्ही शहरे रेड झोन मध्ये असल्यामुळे स्थलांतरित मजुरांना गावी पाठवण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी लागली आहे. या मजुरांना परत पाठवण्याच्या मोहिमेसाठी आता पुण्यामधून रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत.

गाड्यांचा तपशील पुढील प्रमाणे

पुणे रेल्वे स्थानकावरून रविवारी (ता.१७) उत्तर प्रदेशसाठी २, हिमाचल प्रदेश व बिहारसाठी प्रत्येकी एक अशा एकूण ४ रेल्वेगाड्या सोडण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत देण्यात आली. पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधून रविवारी (ता.१७) मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेशासाठी प्रत्येकी एक, उत्तर प्रदेशसाठी एकूण ५ आणि बिहारसाठी २ अशा एकूण ९ गाड्या सोडण्याचे नियोजन आहे. यामध्ये एकूण १२ हजार २७३ प्रवासी पाठविण्यात येणार आहेत.

रविवारी पुणे स्थानकावरून उत्तर प्रदेशसाठी २, हिमाचल प्रदेश व रेल्वेगाड्या बिहारसाठी प्रत्येकी एक अशा एकूण ४ गाड्या प्रस्तावित आहेत. सातारा रेल्वे स्थानकावरून उत्तर प्रदेशसाठी २ गाड्या प्रस्तावित आहेत. याशिवाय सांगलीहून उत्तर प्रदेशसाठी एक, कोल्हापूरहून बिहारसाठी एक तर सोलापूर येथून मध्य प्रदेशसाठी एक गाडी नियोजित आहे.

५३ हजारांहून अधिक मजूर परतले:

पुणे विभागातून १६ मेपर्यंत मध्यप्रदेशासाठी १४, उत्तर प्रदेश १९ उत्तराखंड १, तमिळनाडू १, राजस्थान ४ आणि बिहारसाठी ३ अशा एकूण ४२ रेल्वे रवाना करण्यात आल्या आहेत. यामधून ५३ हजार ४९२ मजूर मूळगावी पाठविण्यात आले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा