पुणे, दि. १२ जुलै २०२०: काल पुण्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे त्यामुळे कालचा दिवस या बातमीमुळे चर्चेत राहिला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यामध्ये खडक टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल पुण्यातील चार शासकीय अधिकाऱ्यांची बदली केल्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले.
अशा आहेत बदल्या
• पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांच्या जागी पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार यांची महापालिका आयुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची ‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
• सौरभ राव (२००३ बॅचचे आएएस) यांची साखर आयुक्तालयातून पुण्याच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
• विक्रम कुमार (२००४ बॅचचे आएएस) यांची पीएमआरडीएच्या सीईओपदावरुन पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
• पुण्यातील कृषी विभागाचे आयुक्त सुहास दिवासे (२००९ बॅचचे आएएस) यांची पीएमआरडीएच्या सीईओपदी नियुक्त झाली आहे.
• जितेंद्र दुडी २०१६ बॅचचे आएएस) यांची सांगली जिल्हापरिषदेच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, पुण्यात कोरोनाचा वाढलेला उद्रेक लक्षात घेता राज्य सरकारने हे बदल केले आहेत. कोरोनाची स्थिती हाताळण्यात काही अधिकारी कमी पडत असल्याने त्यांच्या बदलीची शिफारस करण्यात येत असल्याचे केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी कुणाल कुमार यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी