पाच देशातून प्रवास करत, नाशिकचा तरुण पायी निघाला पवित्र हज यात्रेला

नाशिक, ४ जुलै २०२३: देशातील अनेक राज्ये ओलांडून, महाराष्ट्रातून दिल्ली तेथून पुढे इराण, इराक, करबलानंतर कुवेत आणि शेवटी सौदी अरेबियात पोहचून, नाशिकचा ४० वर्षीय तरुण अली शहबाज सय्यद हा पुढील वर्षी पवित्र हज यात्रेत सहभागी होईल. नाशिकमधील बडी दर्गा येथून सोमवारी अलीने हज यात्रेसाठी पायी प्रवास सुरू केला. लहानपणापासून हज यात्रा पायी करण्याची इच्छा माझी इच्छा होती. यासाठी मी चार वर्षे तयारी केलीय, आता ध्येयाच्या दिशेने प्रत्यक्षात प्रवास सुरू झाला आहे असे अली शहबाज सय्यद याने यावेळी बोलताना सांगितले.

अलीने वयाच्या २० व्या वर्षी २००३ ला नाशिक ते राजस्थानातील अजमेर दर्गा हा प्रवास सायकलद्वारे पूर्ण केलाय. हज यात्रेलाही सायकल किंवा पायी जाण्याचे त्यांचे ध्येय तेव्हापासूनच होते. नुकताच, केरळच्या शिहाब या तरुणाने केरळ ते मक्का हा ८ हजार ६४० किलोमीटरचा प्रवास पायी पूर्ण केला, त्याच्यामुळे अलीलाही प्रवासाची प्रेरणा मिळाली. अली आता ८ हजार ६० किलोमीटर अंतर पायी कापत हज यात्रेसाठी सोमवारी निघालाय. वर्षभराच्या प्रवासानंतर तो ३ जून २०२४ ला मक्का येथे पोहोचणार आहे. १६ जून २०२४ पासून सुरु होणाऱ्या यात्रेसाठी रोज २५ किलोमीटर अंतर पायी कापण्याचे त्याचे नियोजन आहे.

या प्रवासात अलीचा पहिला मुक्काम दिंडोरीत असणार आहे. पेठ, धरमपूर यामार्गे गुजरातमधील मीरअली दर्ग्यावर तो थांबेल. ११ ऑगस्टपर्यंत अजमेर, १६ २१ ऑक्टोबरपर्यंत दिल्लीतील हजरत निजामुद्दीन दर्ग्यावर तो पोहोचणार आहे. अलीच्या या प्रवासात पाकिस्तान ही होते, पण पाकिस्तानचा व्हिसा न मिळाल्याने अली दिल्लीहून २१ ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाचला विमानाने इराणला पोहोचेल. तिथून पुन्हा पायी तो सौदी अरेबियात २५ मार्च २०२४ ला प्रवेश करणार आहे. त्याच्या या प्रवासाच्या परवानगीसाठी त्याला सरकार दरबारी बऱ्याच फेऱ्या माराव्या लागल्या. यात त्याला अनेकांनी मदत केली.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा