बारामती शहरात अपघातग्रस्तानेच खड्ड्यात लावले झाड

बारामती, २६ ऑक्टोबर २०२०: बारामती शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. कसब्यातील ढवाण पाटील चौकातील तर आज खड्यात पडलेल्या दुचाकीस्वाराने झाडे आणुन लावण्यात आली. रस्त्यांच्या या दुरावस्थेबाबत अनेक वृत्तसंस्थांनी वारंवार बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत.

बारामती शहरातील सर्वच रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. फलटण रोड वरील ढवाण पाटील चौकातील खड्यात सूर्यकांत आगम दुचाकीवरून पडले. त्यांच्या हाताला व पायाला चांगलेच खर्चटल्यावर अजून कोणी खडय्यात पडून जखमी होऊ नये किंवा संबंधित विभागाचे लक्ष जावे व हा खड्डा बुजवावा या उद्देशाने हे झाड लावल्याचे आगम यांनी सांगितले.

शहरात प्रवेश करणाऱ्या तसेच गल्ली बोळातील रस्ते खराब झाले आहेत. याबाबत नागरिकांनी बरेच वेळा बारामती नगरपालिकेत तक्रार करून देखील पालिका प्रशासन रस्त्याची दुरुस्ती करत नाहीत, तर स्थानिक नगरसेवक आम्ही सांगितले आहे असे उत्तर देतात. एखाद्याचा बळी गेल्यावर रस्त्यांची कामे होणार आहेत का? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा