माढा तालुका कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या वतीने वृक्षारोपण व वृक्षवाटप

8

सोलापूर, दि. २ जुलै २०२०: माढा तालुका कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या वतीने माढा तालुक्यातील प्रत्येक गावात दोन अल्पभुधारक शेतकऱ्याला वृक्षारोपण व वृक्षवाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

वृक्षारोपण केलेली झाडेही शेतकऱ्याला आर्थिक फायदा करून देणारी आहेत. हि झाडे अल्पभूधारक शेतकऱ्यांना वाटप केली जातात जेणे करून एक कागदी लिंबाचे झाड वर्षाला पाचशे लिंबू देते. एक रूपया दराने एका झाडाचे पाच हजार या प्रमाणे पाच झाडांचे वाषिँक पंचवीस हजार रूपये तेही बांधावर झाड असल्याने दुस-या पिकांचे उत्पादन घेण्यास कोणताही अडथळा नाही. संघटना कागदी लिंबू, सिताफळ, रामफळ, आंबा हि रोपे वाटप करत आहे. आशाप्रकारचा महाराष्ट्र भर संघटनेने हाच उपक्रम राबविल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे.

यावेळी कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष शुभम लोकरे, कृषी पदवीधर कार्याध्यक्ष सागर जाधव, उजनी तंटामुक्ती अध्यक्ष दिलीपराव पाटील, बाळासाहेब पाटील, अक्षय खारे, साईदीप यादव, अक्षय झिंगे, रोहित माने, ऋषिकेश आरकीले, प्रविण जगताप, भैया देशमुख, अभिजीत भानवसे, अनिल तळेकर, आबा गायकवाड, संतोष माने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा