वाघिरा गावात व्हॉटअप ग्रुपवरून वृक्ष लागवड; १५ दिवसाला लोक वर्गणी काढून पाणी

बीड, दि.२९ मे २०२० : पाटोदा तालुक्यातील आदर्श असलेले वाघिरा गावातील युवकांनी ‘संत सिताराम बाबा वाघिरा’ या व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येऊन एक आदर्शवत उपक्रम हाती घेतला आहे.

या ग्रुप मधील सदस्यांनी गेल्या वर्षी व्हाट्सएप ग्रुपवर चर्चा करून गावात झाडे लावली पाहिजेत ही कल्पना सुचविली व ती सर्व सदस्यांनी अमलात आणली देखील. त्यानुसार गावात रस्त्याच्या कडेने वृक्ष लागवड देखील करण्यात आली आहे. प्रत्येकाने एक झाड दयावे असे नियोजन करण्यात आले. झाडे मिळाली आणि ती लावली पुन्हा पाण्याच्या सोयीसाठी सर्वजण सहकार्य करत आहेत , जेवढे जमेल तेवढे पैसे प्रत्येक जण त्या झाडांना पाणी घालण्यासाठी देत आहेत.

एवढ्या उन्हाळ्यात त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये देखील ती झाडे जगवली आहेत. गावाच्या निसर्गाचे जतन करण्यासाठी गावातील नागरिक खंबीरपणे उभे आहेत हेच मोठे भाग्य गावाला लाभले आहे.

त्यांच्या या उपक्रमाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. एक आदर्श उपक्रम सोशल मिडीयावरून या युवकांनी राबवला आहे. हे खरंच आदर्शवत आहे. एकमेकांच्या सहकार्यातून झाडे जगवणे तसे सोपे नाही. आजच्या काळाची जी सर्वात जास्त गरज आहे. ते हे युवक करताना दिसत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा