जम्मू-काश्मीर, ८ डिसेंबर २०२२ : भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी (ता. आठ) डॅगर वॉर मेमोरियल येथे श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी ब्रिगेडियर संजीव कुमार, ऑफिशिएटिंग जनरल ऑफिसर कमांडिंग, डॅगर डिव्हिजन आणि इतर लष्करी कर्मचाऱ्यांनी डॅगर वॉर मेमोरियलला पुष्पहार अर्पण केला आणि त्यांच्या संस्मरणीय लष्करी कारकिर्दीचे स्मरण करून माजी संरक्षण प्रमुखांना आदरांजली वाहिली.
बारामुल्लाच्या लोकांनी डाक बंगला, बारामुल्ला येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते . याप्रसंगी बोलताना श्री. तौसिफ रैना, नगरपालिकेचे अध्यक्ष, बारामुल्ला यांनी जनरल रावत यांचा काश्मीरमधील लोकांशी, विशेषत: बारामुल्लाच्या नागरिकांशी असलेल्या विशेष संबंधांचा उल्लेख केला. जनरल रावत हे परिसरातील विविध स्थानिकांच्या सतत संपर्कात होते, असे त्यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड