कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांना सासवड येथे श्रद्धांजली

पुरंदर, ११ सप्टेंबर २०२०: राज्यामध्ये कोरोना महामारीच्या काळात वार्तांकन करीत असताना कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झालेल्या पत्रकारांना आज सासवड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर एकत्र येत पुरंदर तालुका पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने राज्यभर आज या पत्रकारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. तालुक्यातील सासवड येथे सुद्धा पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर व पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता भोंगळे यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी सासवड येथील पत्रकार प्रदीप जगताप, बाळासाहेब कुलकर्णी,
संभाजी महामुनी, जीवन कड, निलेश झेंडे, आदी पत्रकार उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हा संघाचे अध्यक्ष म्हणाले की, पत्रकर हा समाजाच्या समस्या मांडण्यासाठी नेहमीच झटत असतो. मात्र त्याची आर्थिक परिस्थती नाजूक असते. मोठ्या रोगाचे उपचार घेताना त्यांना समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यायला हवे. शासनाने सुद्धा पत्रकारांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला हवे आणि कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या पत्रकरांना विमा कवच द्यायला हवे. यावेळी संभाजी महामुनी, प्रदीप जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा