अभाविप मार्फत देण्यात येणार शहीद जवानांना श्रद्धांजली

14
पुणे, १४ फेब्रुवरी २०२१: पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्य पुणे नगर एकत्रित येऊन श्रद्धांजली अर्पण करणार अाहेत.
आपल्या सर्वांना माहिती आहे की, आजपासून २ वर्षांआधी म्हणजेच १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे भ्याड हल्ला झाला होता. या हल्ल्यात आपल्या एकूण ४० जवानांना वीरमरण आले होते. या जवानांच्या कुर्बानी लक्षात ठेवून, आज दिनांक १४ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्य पुणे नगर यांच्या वतीने वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्रित येण्याचे आयोजन राणी लक्ष्मीबाई चौकात केलेले आहे.
तरी, या वेळी ठीक ७.३० वाजता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केलेले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रगती कराड