सैनिकांच्या गावात शहिदांना श्रद्धांजली

पुरंदर, दि. २७ जून २०२०: पुरंदर तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंगोरीतील ग्रामस्थांनी आज गलवान(लडाख) मधील सीमेवर चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ला हल्ल्यावेळी लढत असताना शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

आज सकाळी पिंगोरी येथील काही निवडक तरुण व येथील माजी सैनिक कॅप्टन शामराव शिंदे महादेव गायकवाड यांच्या हस्ते शहीद स्मारकासमोर पुष्प पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यानंतर लडाख मधील गलवान येथे चिनी सैन्याबरोबर झालेल्या झटपटीत शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी पिंगोरीचे पोलीस पाटील राहुल शिंदे माजी सरपंच हरिश्चंद्र यादव, पल्लवी भोसले, सदाशिव शिंदे, अमोल शिंदे, शामराव भोसले, निनाद शिंदे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शिंदे यांसह काही तरुण व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सैन्यामध्ये सेवा केलेल्या कॅप्टन शामराव शिंदे व महादेव गायकवाड यांनी लढाई मधील आपले अनुभव लोकांना सांगितले.

त्याचबरोबर युद्धाच्यावेळी लोकांनी दिलेला पाठिंबा सैनिकांमध्ये चेतना निर्माण करतो, त्यांचे मनोधैर्य वाढवतो व सैनिक मोठ्या जोमाने लढाईला सामोरे जातो. म्हणूनच सैनिक सीमेवर लढत असताना आपण कोणतेही राजकारण न करता सैन्याला पाठिंबा देणे गरजेचे असल्याचे कॅप्टन शामराव शिंदे म्हणाले. सैन्यातून निवृत्त झालेले महादेव गायकवाड यांचे पुत्र विशाल गायकवाड हे आजही गलवान खोऱ्यामधील भारत-चीन सीमेवर दाखल आहेत. गेल्या काही दिवसापासून मुलाशी त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. मात्र आपला मुलगा शत्रूच्या समोर दंड थोपटून उभा आहे. याचा त्यांना अभिमान असल्याचे ते म्हणाले.

पिंगोरी हे मुळातच शिवसैनिकांचा गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील दोन जवानांनी हौतात्म्य पत्करले. यापूर्वी श्रीलंकेत शांती सेनेत असताना शहीद रमेश शिंदे यांना वीरमरण आले होते. तर कारगिल युद्धात शहीद शंकर शिंदे यांना हौतात्म्य प्राप्त झाले. त्याचबरोबर याच गावातील सैनिकांनी दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतला होता. गावात सैनिकी सेवेत
असणा-याची संख्या जास्त असल्याने युद्धाचे प्रसंग सुरू होतात गावांमध्ये चिंतेचे वातावरण असते. त्याच बरोबर आपल्या गावातील तरुणांनी पराक्रमाची शर्थ करून शत्रूला नामोहरम करावे अशी भावना येथील लोकांकडून व्यक्त केली जात असते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा