गोल पोस्ट स्पॉटलाइट संगीत ‘ट्रिपल सीट’मधील गाणं रिलीज

‘ट्रिपल सीट’मधील गाणं रिलीज

अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत असलेल्या बहुप्रतिक्षित ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटातील ‘काय तू’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

कसं आहे गाणं ?

आधी रिलीज झालेल्या दोन गाण्यांपेक्षा हे गाणं भावनिक थाटनीचं असल्याचं दिसून येतं आहे.

गाण्याचे बोल भावनिक असून यामध्ये अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे, पल्लवी पाटील यांच्या भावमुद्रादेखील भावनिक दिसत आहेत.

चित्रपटातील आधीची 2 रोमँटिक गाणी आणि आताचं हे भावनिक गाणं यामुळे चित्रपटाविषयी उत्सुकता वाढत आहे.

या गाण्याचे आणखी प्रमुख आकर्षण म्हणजे गाण्याला सोनू निगमचा सुमधुर आवाज होय. गाण्याचे संगीत अविनाश विश्वजित यांचे असून गीतकार अश्विनी शेंडे या आहेत.

गाणं पाहण्यासाठी क्लिक करा : http://bit.ly/32xkW6C

error: Content is protected !!
Exit mobile version