गोल पोस्ट गुन्हा तेलंगणाच्या सायबराबादमध्ये महिलांशी गैरवर्तन केल्याबद्दल टीआरएस नगरसेवकाला अटक

तेलंगणाच्या सायबराबादमध्ये महिलांशी गैरवर्तन केल्याबद्दल टीआरएस नगरसेवकाला अटक

तेलंगाना, २२ सप्टेंबर २०२०: तेलंगाना मधील राष्ट्र समितीच्या एका नगरसेवकाला सायबराबादमध्ये एका महिले बरोबर पार्किंगवरून गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सायबराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी रात्री एक टीआoiरएस नगरसेवक रगम नागेंद्र यादव, राहणार लक्ष्मी विहार, सेरीलिंगमपल्ली यांनी आपली गाडी घराबाहेर अशा प्रकारे उभी केली होती की, दुसरी गाडी जावू शकत नव्हती. त्यामुळे महिलेने कार मालकास विनंती केली, कार बाजूला घ्या म्हणजे वाहतूक सुरळीत होईल.

जेव्हा वाद सुरु झाला तेव्हा आरोपीने वाहन बाजूला काढण्यापूर्वी त्यांच्याशी वाद घातला. नंतर आरोपीने आपली कार बाजूला काढताना अपशब्द वापरले त्यामुळे भांडण सुरू झाले, आरोपीने पीडित मुलीला धक्काबुक्की केली तसेच पार्किंगच्या जागेवरुन गाडी बाजूला काढण्यास बाहेर भाग पाडल्याबद्दल तिच्या चेहऱ्यावर जोरदार थापड मारली. पोलीसांनी सांगितले, पीडितेने नगरसेवकाविरोधात तक्रार दाखल केली, या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयीन रिमांडसाठी कोर्टात हजर केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कायदा सर्वांसाठी एक आहे हे या प्रकरणातून दिसून आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version