नवले पुलावर अपघाताची मालिका सुरुच, ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारला धडक

पुणे, १४ ऑक्टोंबर २०२३ : मुंबई – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुण्यातील नवले पुल परिसरात आज सकाळी ९ च्या सुमारास भीषण अपघात झाला. सिमेंटने भरलेला ट्रक सिग्नल जवळ येताच, चालकाचे गाडी वरचे नियंत्रण सुटले आणि ट्रक पलटी झाला. अपघातामध्ये एक कार आणि एका दुकाचीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर ट्रकचालक पळून जात असताना नागरिकांनी त्याला पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले.

हा अपघात इतका भीषण होता की, सिग्नल जवळ थांबलेल्या कारला खूप मोठ्या प्रमाणात थडक बसल्याने कारचा जागेवर चक्का चूर झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण नवले पुलावरची अपघाताची मालिका अजून सुरूच असल्याने सर्वसामान्यांचे मात्र हाल होत आहेत. याबाबत घटनेची माहिती मिळताच, सिंहगड रस्ता पोलीस तसेच हायवे पेट्रोलिंगचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या साहाय्याने बाजूला केलं. या अपघाता संदर्भात अधिक तपास पोलीस प्रशासन करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा