डोनाल्ड ट्रंम्प यांना पत्नी शोक

अमेरिका 15 जुलै 2022 : अमेरिकेचे माजी पंतप्रधान डोन्लाड ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नी इवाना ट्रंप यांचे काल दुख:द निधन झाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मिडीयावरुन ही बातमी प्रसिद्ध केली. त्यांनी तिच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी इवाना 73 वर्षांच्या होत्या.

इवाना ही अतिशय सुंदर, प्रतिभावान व्यक्ती होती. इवाना यांना डोनाल्ड ट्रंप यांच्यापासून तीन मुले आहेत. डोनाल्ड ज्युनिअर, एरिक आणि इवांका अशी तीन मुले आहेत. इवाना या अत्यंत प्रतिभाशाली मॉडेल आणि स्त्री होत्या. 1977 मध्ये इवाना यांनी डोनाल्ड ट्रंप यांच्याशी विवाह केला. पण हा विवाह खूप काळ टिकू शकला नाही. 90 च्या दशकात जिथे घटस्फोट या संकल्पनेला नुकतीच सुरुवात झाली होती, त्या काळात डोनाल्ड आणि इवाना यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर इवाना यांनी आपल्या तिन्ही मुलांना अतिशय नेटाने आणि कष्टाने वाढवले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण परिवार दु:खात बुडाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा