विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शिवसेना मुख्यमंत्रीपदावर आडून आहे व शिवसेनेच्या नेत्यांकडून हा विषय सतत लावून धरण्यात आला आहे. पण या सर्वांमध्ये आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरत आहोत की मोदींनी निवडणुकीआधीच हे जाहीर केले होते की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. हा वाद होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असेल. भाजपला बहुमत मिळण्याचा अंदाज सर्वत्रच लावला जात होता परंतु यावरून ही एक निश्चित घटना होती ती म्हणजे मोदींनी आपल्या भाषणात केलेले वक्तव्य ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचे.
३१ ऑक्टोबर रोजी दुपारी झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत एकनाथ शिंदे यांना गटनेते पद देण्यात आले आणि ते निश्चित ही होते परंतु बैठकी नंतर बाहेर पडलेले नेते कोणतेही वक्तव्य करण्यास तयार नव्हते. उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे एकच वक्तव्य सर्व आमदारांचे होते. नेत्यांना पत्रकारांनी मुख्यमंत्री पदाविषयी प्रश्न विचारला असता या प्रश्नावर सर्व आमदारांनी मौन बाळगले होते. मग असे म्हणायला वावगे ठरणार नाही की शिवसेनेला कदाचित मुख्यमंत्रीपद नकोय. याचे कारण असे की कमीतकमी त्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा आहे याला तरी समर्थन द्यायला हवे होते पण एकाही नेत्याकडून ठामपणे व स्पष्टपणे या प्रश्नाचे उत्तर देण्यात आले नाही.
मग निकाल लागल्यापासून शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जो नाट्यमय प्रकार चालू आहे हा फक्त कार्यकर्त्यांना आणि जनतेला दाखवण्या पुरताच आहे का? एकूण घडामोडी पाहता कदाचित शिवसेनेने काही महत्त्वाची मंत्रिपदे मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात मागितली असावीत. शिवसेनेची केंद्रामध्ये महत्वाचे कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची मागणी असावी, तसेच महाराष्ट्र मध्ये गृहमंत्री पद, महसूल मंत्री पद इत्यादींसारखे महत्त्वाची पदे मागितली असावीत. सत्तास्थापनेसाठी काही दिवसांचा वेळ उरला आहे. राष्ट्रपती राजवट की शिवसेनेची सत्ता अश्या अनेक चर्चा सध्या प्रसार माध्यमांवर चालू आहेत. सरकार महायुतीचेच येणार बाकी सर्व चर्चा व्यर्थ ठरणार आहेत का? तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो असा खेळ शिवसेना-भाजपमध्ये चालू आहे का?…