बारामती: तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त काटेवाडी पालखी ओटा याठिकाणी मंगळवार (दि.२०) रोजी हभप सावता महाराज फुले यांचा भारुडाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याचप्रमाणे बुधवार (दि.११) रोजी सकाळी सपत्नीक संदीप सोलणकर यांच्या हस्ते नांद्रुक वृक्ष अभिषेक, प्रतिमापूजन व मूर्ती अभिषेक करण्यात आला. सकाळी दहा वाजता कीर्तनकार हभप हनुमंत महाराज रणवरे यांचे किर्तन सुरु होऊन दुपारी बारा वाजता वैकुंठगमन अभंग पुष्पवृष्टी व आरती सपत्निक प्रकाश मारुती काटे व सरपंच विद्याधर श्रीकांत काटे यांच्या हस्ते घेण्यात येऊन साडेबारा वाजता तुकाराम महाराज तुकाराम महाराज यांच्या नाम घोषात उपस्थित सर्व ग्रामस्थांच्यावतीने तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पवृष्टी अर्पण करण्यात आली. यावेळी तुकाराम महाराजांच्या अभंगाने संपूर्ण परिसर नाव्हुन निघाला होता.
तुकाराम महाराज बीज सोहळ्यास सरपंच विद्याधर काटे, उपसरपंच धीरज घुले, सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रकाश काटे, नाना काटे, मारुती काटे, दत्तात्रय काटे, शितल काटे, मिलिंद काटे, स्वप्निल काटे, ग्राम विकास अधिकारी बाळासाहेब भोईटे याच बरोबर गावातील ग्रामस्थ व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी कै. हभप श्रीकांत काटे यांच्या स्मरणार्थ विद्याधर काटे व वैभव काटे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.