तुकाराम मुंडे यांची पुन्हा बदली, आता त्यांच्याकडे सोपवण्यात आला मराठी भाषा विभाग

13

मुंबई ३ जून २०२३ : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने वीस प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहिर केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील प्रशासनात खांदे पालट झाले आहे. परंतु सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे महिनाभरापुर्वीच बदली झालेल्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.

तुकाराम मुंडे यांच्याकडे आता मराठी भाषा विभाग सोपवण्यात आला आहे. गेल्या महिन्यात मुंढे यांची कृषी आणि पशुसंवर्धन विभागात अतिरिक्त सचिव म्हणून बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांची बदली करण्यात आल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

सिंघम अधिकारी अशी ओळख असलेल्या, तुकाराम मुंडे यांच्या प्रशासकीय सेवेत आतापर्यंत त्यांच्या मागील १८ वर्षांत २१ वेळा बदल्या झाल्या आहेत. त्यांची ज्या विभागात नेमणूक होते, त्या ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवतात. शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची त्यांच्या कार्यालयात ओळख आहे. परंतु एक महिन्यात परत त्यांची बदली झाल्यामुळे, त्यांच्यामागे लागलेले बदलीचे ग्रहण काही सुटताना दिसत नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर