मुंबई, १० सप्टेंबर २०२०: आयुक्तपदावरून तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली होती. २६ ऑगस्ट रोजी या बदलीचे आदेश निघाले होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी ही बदली करण्यात आली होती. मात्र राज्य सरकारने अवघ्या १५ दिवसात हे आदेश मागे घेतले आहेत. तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली.
तुकाराम मुंढे यांची २६ ऑगस्टला मुंबईत बदली करण्यात आली होती, तर त्यांच्याकडे असलेल्या नागपूर महापालिका आयुक्तपदाचा कारभार राधाकृष्णन बी. यांच्याकडे सोपवण्यात आला होता. तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश रद्द करताना आता मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मुंबई) सदस्य सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. तसे आदेश आज जारी करण्यात आले आहेत.
आयएएस अधिकारी बदली
१) किशोर राजे निंबाळकर – सचिव, मदत व पुनर्वसन यांना सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे (तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश रद्द करुन)
२) एम. जे. प्रदीप चंद्र यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर या रिक्त पदावर
३) ई रवींद्रन यांची नियुक्ती सह विक्रीकर आयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई या पदावर
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे