तुळजापूर, दि.१६ मे २०२० : तुळजापूर तालुक्यातील हंगरगा शिवारातील बायपास रोडवरील बांधकामाच्या ठिकाणी ठेवलेली वेल्डींग मशीन (दि. ९ फेब्रुवारी) चोरणाऱ्याला तुळजापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
अभिषेक मिश्रा, यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये (दि. १३ मे) रोजी फिर्याद दाखल केली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, तुळजापूर पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी आपल्या तपासाची सूत्रे फिरवली. त्यानुसार पोलिसांनी दीपक पवार, रा, तोरंबा तालुका उस्मानाबाद या संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. आरोपींकडून अंदाजे ९० हजार रुपये किंमतीचे वेल्डिंग मशीन जप्त केले. आरोपीस तुळजापूर पोलिसांनी अटक केली व पुढील तपास तुळजापूर गुन्हे शोध पथक करत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रगती कराड