तुळजापूरकर युवकांचा मोलाचा वाटा

137

तुळजापूर : तालुक्यात वाडी वस्त्या या छोट्याशा शहरात प्रशासनाचे काटेकोरपणे पालन करीत आज रोजी गावातील युवकांच्या पुढाकाराने मदत होत आहे.या गावात कोरोनाचे संसर्ग टाळण्यासाठी मास्क व पाणी,जेवण, वाटप करून सामाजिक हित जोपासले असल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केले जात आहे.व तुळजापूर शहरात भटकत फिरणाऱ्या गोर -गरीब लोकांना व बसस्थानक मध्ये बसलेल्या गरीब लोकांना व रात्रंदिवस घरदाराचा विचार न करता जे नगर परिषद चे स्वच्छता कर्मचारी आहेत यांना पण पाणी बॉटल व बिस्किटपुडयाची सोय तीर्थक्षेत्र तुळजापूरचे पुजारी व सामाजिक कार्यकर्ते विजय भोसले व विकास भोसले,भाजपा नेते कृष्णा रोचकरी,गणेश रोचकरी, यानी केली वाटप

सध्या देशात कोरोना संसर्ग महामारीने थैमान घातले असून हा संसर्ग टाळण्यासाठी राज्यात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून ग्रामीण भागातील सर्व गावे व रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. कोरोनाची साथ गावात पसरू नये याची दक्षता घेत गावातील युवकांनी ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेत हा उपक्रम राबविण्यात आला आहे.या मास्क वाटपासाठी व पाणी,जेवण,नाष्टा, हा खर्च स्वतःच्या पैशातून करण्यात आला आहे.

एक प्रतिक्रिया

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा