तुमचे मत विका फक्त ५ रुपयांना !

भाजपचे मंत्री अशोक उइके म्हणतात काहीही करा पण मतं विकत घ्या
निवडणूक तोंडावर आल्या असताना एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे. भाजपचे आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्या संभाषणाची क्लिप व्हायरल झाली आहे.
या वर्षी भाजप कडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे या संधर्भात आदिवासी गोवारी समाजाच्या लोकांची मते विकत घ्यायची चर्चा करताना समोर आले आहेत .त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात खळबळ उडाली आहे. आणि विशेष म्हणजे या मतांची किंमत त्यांनी अवघी ५ ते १० रुपये इतकी लावली आहे.
काहीही करा पण मते विकत घ्या असे ते कार्यकर्त्यांना सांगताना दिसत आहेत.
लाज वाटली पाहिजे या राजकारण्यांना जे जनतेला कवडीमोलाचे समजतात. अतिशय संतापजनक अशी ही बाब आहे. आपल्या कार्यकर्त्यांना उपदेश करताना अशोक उइके म्हणताहेत के गोवारी समाजाची मते वंचित आघाडी ला किंवा आपल्याला पडतात बोलता-बोलता त्यांच्या तोंडातून 500 असा काकडा निघाला होता पण त्यांनी माणसांची किंमत त्यापेक्षाही कमी असल्याचे दाखवत पुढे ते म्हणाले पाच रुपये दहा रुपये जसे जमेल तसे गोवारी समाजातील मते विकत घ्या. स्वतःला राज्याचे आदिवासी विकास मंत्री म्हणणारे लोकांची किंमत कवडी मोलाची समजत आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा