तुर्कस्तान, सीरिया भूकंप : मृतांचा आकडा ४ हजारवर पोहोचला ; भारताकडून एनडीआरएफची टीम रवाना

40

नवी दिल्ली, ७ फेब्रुवारी २०२३ :तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी झालेल्या भूकंपामुळे प्रचंड हाहाकार उडाला आहे. रिश्टर स्केलवर तिन्ही भूकंपाची तीव्रता ७.८, ७.६ आणि ६.० इतकी होती. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की दोन्ही देशांतील शेकडो इमारती कोसळल्या. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत ४,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुर्की आणि सीरियामध्ये किमान ३,४०० लोकांचा मृत्यू झाला असून १५०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दहा शहरांमधील १७०० हून अधिक इमारतींचे नुकसान झाले, असे रिपोर्टमध्ये देशाचे उपाध्यक्ष फिएट ओकटे यांचा हवाला देत सांगण्यात आले आहे. यादरम्यान तुर्कीमध्ये सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

  • भारताकडून मदत

भारताने तुर्कीला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याअंतर्गत एनडीआरएफची टीम आणि विशेष प्रशिक्षित श्वान पथकासह तुर्कीला पाठवण्यात आले.

डेप्युटी कमांडंट दीपक तलवार यांनी सांगितले की की, टीममध्ये ४७ एनडीआरएफ जवान आणि वरिष्ठ अधिकारी आहेत जे संयुक्त राष्ट्रांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काम करतात. आम्हाला दोन टीम पाठवण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. दोन्ही टीम रवाना झाल्या आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा